आपल खान्देशगुन्हेगारी

उमर्टी ते लासूर रस्त्यावर एकाला गावठी बनावटीचा कट्टा सह केली अटक!

चोपडा (प्रतिनिधी)नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी ३० हजार रुपयांच्या गावठी कट्ट्यासह संशयित वसीम सुलतान शेख (रा. मानखुर्द, मुंबई) याला ताब्यात घेतले. तालुक्यातील उमर्टी ते लासूर रस्त्यावरील उत्तमनगर गावाजवळ ७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

७ रोजी दुपारच्या सुमारास उत्तमनगर गावाजवळील पुलाजवळ पायी येणाऱ्या संशयित शेख याला पोलिसांनी अडवले त्याची अंगझडती घेतल असता त्याच्या पॅन्टच्या डाव्य खिश्यात, ३० हजार किंमतीच स्टीलचा गावठी बनावटीचा कट्टा सापडून आला. त्याच्याकडे कट्टा कब्जात बाळगण्याचा कोणताही परवाना नसून विक्री करण्याच्या उद्देशाने, गुरुदेवसिंग उर्फ खटका लिवरसिंग बडोले (रा.पार उमर्टी, ता.वरला,जि.बडवाणी) यांच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. ताब्यात घेऊन गुन्हयातील मुद्देमाल गावठी कट्टा 30,000रु./रु.अशा एकुण तसेच पुढील कारवाई साठी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला हजर केला.



बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे