आपल खान्देश

Pachora | पाचोरेकरांना यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचे राहणार आकर्षण..


पाचोरा येथे हनुमान जयंती उत्सव निमित्ताने बाहेरपुरा भागात पंचमुखी हनुमान चौक येथे जन्मोत्सव सोहळा, मोठया उत्साहाने साजरा होणार आहे.

हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव कार्यक्रम होत असतो, ६ एप्रिल वार गुरुवार रोज या हनुमान जयंतीच्या निमित्ताने पाचोरा शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. पाचोरा शहरातील हनुमान जयंतीनिमित्त शहरातील आठवडे बाजार कृष्णापुरी पंचमुखी हनुमान चौक शिवाजीनगर हनुमान वाडी मानसिंग नगर या भागातील मंदिरे रोषणाईने सजविण्यात आले आहे. यावर्षी नवक्रांती मित्र मंडळ आठवडे बाजार श्रीराम चौक मित्र मंडळ अष्टविनायक मित्र मंडळ जय भवानी मित्र मंडळ जय महाराष्ट्र मित्र मंडळ भगवे वादळ मित्र मंडळ निळा चौक भारतीय नगर संभाजीनगर देशमुखवाडी या सर्व मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एकच मिरवणूक बाहेरपुरा भागातून पंचमुखी हनुमान चौक येथून सर्वात मोठी आकर्षण मिरवणूक काढण्याचे ठरवले आहे. ही मिरवणूक पंचमुखी हनुमान चौक पासून दुपारी ५ वा वाजता निघणार असून आठवडे बाजार जामनेर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक व्ही पी रोड येथून रात्री १० वाजेपर्यंत पंचमुखी हनुमान चौक येथे संपन्न होणार आहे. यावर्षी हनुमान जयंती निमित्त सर्वात मोठा उत्सव असणार आहे. तरी या उत्साहामध्ये पाचोरा शहरातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सव सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आव्हान पंचमुखी हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी उपाध्यक्ष सचिन चौधरी मिरवणूक अध्यक्ष किशोर भोई मार्गदर्शक प्रकाश चौधरी बंडू चौधरी जगदीश पाटील शरद पाटील राहुल महाजन सतीश चौधरी वीरेंद्र चौधरी छोटू चौधरी संजय चौधरी अनिल सावंत उमेश निकम भावेश मिस्त्री प्रसिद्धी प्रमुख गणेश शिंदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे