महाराष्ट्र

दर रविवारची साप्ताहिक पुजा माता भगिनींच्या हस्ते श्री दिपक भोजने


पिपरी (मोरवाडी) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे गेली साडे सहा वर्षांपासून अखंडित पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेची पुजा श्री दिपक भोजने यांच्या पुढाकाराने व समाज बांधवांच्या सहकार्याने होत आहे आज दि.२७\३\२०२२ पासुन महिन्याच्या शेवटच्या रविवारी माता भगिनींच्या हस्ते पुजन करण्यात येणार आहे आज सौ. रसिका गजानन ठोंबरे या भगिनींच्या हस्ते पुजन करण्यात आले.

आपले मनोगत व्यक्त करताना महिला भगिनी म्हणाल्या दर रविवारची साप्ताहिक पुजा हा चांगला उपक्रम दिपकभाऊ भोजने यांनी राबवला व आम्हा महिलांना दर महिन्याचा शेवटच्या रविवारी महिलेच्या हस्ते पुजन करणार ही चांगली कल्पना आहे या निमित्ताने समाज भगिनी एकत्र येतील यावेळी सौ. सुरेखा विजय महानवर सौ. रेणुका दिपक भोजने सौ. ललिता योगेश हुगे सौ. सोनाली किसन फसके सौ. संगीता निलेश हुगे समाजिक कार्यकर्त्या सौ. रोहिणी रासकर व श्री शंकर दातीर श्री विजय महानवर श्री किसन फसके श्री गजानन ठोंबरे श्री बंडू लोखंडे समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते श्री दिपक भोजने यांनी प्रास्ताविक करताना दर रविवारच्या साप्ताहिक पुजेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम महिला दिन , डाॅक्टर डे , नर्स डे , समाज बांधवांचे वाढदिवस , साप्ताहिक पुजा वर्धापनदिन यांचे आयोजन करण्यात येते महिला भगिनींच्या हस्ते पुजनाच्या वेळी ज्यास्तीत ज्यास्त महिला भगिनींनी उपस्थित राहाण्याचे अहवान करण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे