मुंबईत राहून कुसुंब्याशी आपली नाळ घट्ट करणारे आरटीओ धनराज शिंदे
वाढदिवस विशेष
कुसुंबा गावातील सर्व साधारण शिंदे कुटुंबातील पोरगं एक दिवस मोठा अधिकारी होणार हे स्वप्न उराशी बाळगतो आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि हिमतीवर आरटीओ इनेस्पेकटर होतोच, श्री धनराज शिंदे यांचा आज जन्मदिन गेल्या सहा वर्षापासून पनवेलच्या वाहतूक शाखेची धुरा सांभाळणारे तसेच महाराष्ट्रात पहिले मोफत वाय-फाय देऊन स्मार्टकुसुंबा गावाला मान त्यांच्या कल्पनेतून मिळाला होता, पनवेल येथे राहून आपल्या कुसुंबा गाव हे कसे विकसित होईल याचे स्वप्न पाहत गावात नव नवीन प्रकल्प हातात घेतले. गाव कसे हिरवे होईल झाडे लावा झाडें जगवा हा मंत्र घेऊन रांनात झाडे लावली आणि जगवली, भूमिगत गटारे, घंटा गाडी, असे कित्येक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी गावशी आपली नाळ घट्ट केली गावातील तरुणांचे प्रेरणादायी श्री धनराज शिंदे हयांनी कधीच मोठे पणा दाखवला नाही, मनमिळावू स्वभावाचे सर्वांशी गोड बोलणारे स्वतः सरपंचचा मुलगा व एक वरिष्ठ अधिकारी असून लहान थोरांचा मानसन्मान करणारे कुणाचेही मुंबईत विभागातील काही काम असले तरी तत्परतेने सोडवण्यासाठी प्रयत्न करतात कधीही कोणाचे मन न दुखवता गोड बोलून सर्वांची काम करून देणारे नवी मुंबई वाहतूक ट्राफिक विषयी जागृत करणारे सर्वांशी व कुसुंबा गाव कसे विकसित होईल याचे स्वप्न बघणारे आरटीओ धनराज शिंदे म्हणजे साधे सरळ व्यक्तिमत्व साधा भोळा स्वभाव चेहऱ्यावर सतत हसतमुख शहरातील सर्व पक्षांची व सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध जपून,महिलावर्ग व वयोवृद्ध यांना चांगली वागणूक देऊन त्यांचा सन्मान करतात अशी आरटीओ इनेस्पेकटर धनराज शिंदे यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
शब्दांकन दिलीप जय परदेशी






