आपल खान्देश

कांग्रेसच्या शिंगाडा मोर्चाने वेधले पाचोरेकरांचे लक्ष!

शेतकर्‍यांना अनुदानाचा दुसरा टप्पा मिळणार..


झूम मराठी

पाचोरा (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना अनुदान सह धान्य पुरवठा तात्काळ मिळण्यासाठी आज पाचोरा येथे कॉंग्रेस पक्षाने भव्य शिंगाडा मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

पाचोरा तहसील कार्यालयातील शहर आणि तालुक्यातील विविध समस्या त्वरीत सोडविण्यासाठी आज पाचोरा कॉंग्रेसने शिंगाडा मोर्चाचे दि २१ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आठवडे बाजारातुन या मोर्चास सुरुवात झाली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व पाचोरा कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रमुख मागण्यात पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानातून जानेवारी २०२२ चा मोफत धान्य चा अद्याप पुरवठा झाला नाही. यात तालुक्यातील काही ठिकाणी पुरवठा बाकी आहे तो तात्काळ देण्यात यावा. शहरातील जवळपास २२०० दारिद्र्यरेषे खालील कुटुंब आहेत मात्र केवळ चार कुटुंबांना लाभ दिला जातो गेल्या विस वर्षा पासुन बीपीएल धारकांनावर अन्याय होत असुन त्यामुळे धान्य पुरवठा हक्काचा मिळत नाही. त्या कुटुंबाना तात्काळ समाविष्ट करण्यात यावा. तसेच ज्यांच्या मुळे वंचित राहिले त्यांची चौकशी सुरू करुन कारवाई करण्यात यावी. शहर व तालुक्यात काही मयत लाभार्थीच्या नावे धान्य पुरवठा केला आहे संबंधित लाभार्थींनी या बाबत संबंधित दुकानदार यांना वेळोवेळी सुचित करुन बदल केला केला नाही अशा बेजबाबदार दुकानदार सह संबंधित अधिकारी यांच्या वर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. विधवा परीतक्ता, दिव्यांग, अनाथ यांना बीपीएल मध्ये समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांचे राहीलेल्या अनुदान तात्काळ देण्यात यावे यात वैगरे असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा. शासकीय तुकडा बंदी कायदा असताना त्याची अंमलबजावणी नकरता बेकायदेशीर खरेदी होत असुन तलाठी त्याची नोंद गैरकायदा करत आहे याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी यासह अनेक मागण्यांचे आधीच दिले होते. सदर निवेदनातील सर्वच मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांनी देवुन शेतकऱ्यांना अनुदानाचा दुसरा टप्पा तातडीने देण्यात येणार असल्याचे सांगितले.अपगांना बीपीएल मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ अनिरुद्ध साळवे, संगिता नेवे, कुसुम पाटील , अॅड मनिषा पवाइ, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, अॅड वसिम बागवान, शंकर सोनवणे, शरीफ शेख, गणेश पाटील युसूफ टकारी,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, इस्माईल तांबोळी, राजेंद्र महाजन, अल्ताफ खान, रहीम शेख, सचिन सोनवणे, रवी सुरवाडेअमजद मौलाना, प्रदीप चौधरी, सलीम शेख, नसोरीद्दीन तडवी , सुनील पाटील, शिवराम पाटील, लक्ष्मण पाटील, यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे