आपल खान्देशगुन्हेगारी

साक्री शहरात धुलिवंदनाला गालबोट : हाणामारीत तिघे गंभीर!

झूम मराठी

साक्री : होळी-रंगपंचमी सणाच्या नियमावलीत राज्य सरकाने एक दिवस आधीच शिथिलता दिल्यानंतर सणांचा सर्वत्र उत्साह सुरू असताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मात्र सणाला गालबोट लागले. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत असतानाच दोन गट भिडल्यानंतर तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी दाखल घेत शांतता प्रस्थापीत केली असून सात संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

साक्री शहरातील तरुण धुळवडीचा उत्सव डीजे समोर नाचून साजरा करीत असतानाच दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला आणि काही तरुणांनी थेट धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार करण्यास सुरूवात केली. या हाणामारीमध्ये जवळपास सहा ते सात जण जखमी झाले तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

वादानंतर डीजेही फोडला

हल्ल्यातील सर्व जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वाद वाढल्यानंतर डीजेदेखील घटनास्थळी फोडण्यात आला. पोलिस प्रशासनातर्फे या संदर्भात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे