ब्रेकिंग

उलटे फलक फडकवून मनसेच्या राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंना डिवचले

झूम मराठी वृत्त

डोंबिवली : मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील हे विकास कामे रखडल्याबद्दल कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करत असतात. आता, अशाच न झालेल्या कामांचा उल्लेख करून, या कामांसाठी प्रयत्न (बोलघेवडेपणा) केल्याचा टोमणा मारताना लक्ष्यवेधी फलक राजू पाटील यांनी फडकवला आहे. या फलकात, न झालेल्या कामांचा उलट्या अक्षरात उल्लेख करून पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.

डोंबिवलीतील निवासी भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३६ कोटी रुपयांचा निधी आणला, असे फलक शिवसेनेकडून लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेकडून शिवसेनेच्या अभिनंदनाचे उलटे फलक लावण्यात आले. यात, काम सुरु करा असा आग्रह मनसेने केला आहे. ‘तुम्ही रस्त्याचे काम सुरू करा आम्ही तुमचे अभिनंदन करू’ असे राजू पाटील यांनी म्हटले आहे

रस्त्याच्या कामाचे १७ फेब्रुवारीला शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसेचे आमदार पाटील उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी “आत्ता मनसेच्या आमदारांनी काम सुरू झाल्यावर अभिनंदनाचा फलक लावावा” असा टोमणा मारला होता. त्यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अभिनंदनाचा फलक नक्की लावणार, असे सांगितले होते. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

त्यामुळे शिवसेनेच्या अभिनंदनाचा उलटा फलक राजू पाटील यांनी ट्विट केला आहे.पाटील यांनी टोमणा मारला “आम्ही विरोधक आहोत सत्ताधाऱ्यांकडून काम करून घ्यायचे ही आमची जबाबदारी आहे. या अनुषंगाने, आज होळीचे निमित्त शोधून एक उलटा फलक लावला आहे. हा फलक खाली डोके, वर पाय करून वाचवा लागेल. रस्त्याचे काम सुरु झाले की आम्ही हा फलक सरळ करू.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे