आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
महाराष्ट्रातील सहा शिक्षकांचा केंद्र शासनाच्या वतीने होणार सन्मान!
28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे होणार सन्मान सोहळा
मुंबई(विशेष प्रतिनिधी उदय नरे)केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युके शनल टेक्नॉलॉजीकडून (सीआयईटी) शिक्षकांसाठीचे राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्काराचे वितरण दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांचे पुरस्कारांचे वितरण होणार असून यात राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सहा शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आहे.
एनसीआरटी नवी दिल्ली यांच्या वतीने देशातील शिक्षकांना विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात .या वर्षी सन 2018 आणि 2019 या वर्षीचे हे ICT पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
संपूर्ण देशातील 28 राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेश यांच्यातील 205 शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या त्यामधून राज्यातील दोन वर्षांच्या 6 शिक्षकांना हा ICT पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करणाऱ्या शिक्षकांना आयसीटी पुरस्कार देण्यात येतात. २०१८ साठी देशभरातील २५ शिक्षकांची, २०१९ साठी देशभरातील २४ शिक्षकांची निवड करण्यात आली. राज्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये
2018 साठीच्या ICT पुरस्कार प्राप्त शिक्षक


