महाराष्ट्र
चिंचवड येथील गजानन महाराज मंदिराचा बंदोबस्त के के टी एफ च्या सदस्यांनी चोख पणे बजावाला
दिनांक 23 फेब्रुवारी गजानन महाराज( शेगाव) यांचा प्रगट दीन यावर्षी गजानन महाराज प्रगट दीन तिथी आणि तारीख एकच आल्याने या उत्सवास विशेष महत्व प्राप्त झाले.
कै. तुकाराम तनपुरे संस्थेचे( KTTF) अध्यक्ष अशोक तनपुरे आणि महीला अध्यक्षा सौ अमृता वैद्य यांचे नेतृत्वाखाली चिंचवड पोलिस स्टेशन चे अंतर्गत KTTF चे सदस्यांनी चिंचवड येथील गजानन सत्संग मंडळाचे गजानन महाराज मंदिर येथे बंदोबस्त केला
चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री कृष्णदेव खराडे साहेब आणि पोलिस निरीक्षक श्री किशोर पाटील साहेब आणि एल. आय.बी. चे वरिष्ठ अधिकारी कांबळे साहेब आणि सागर आढारी साहेब यांचे मार्गदर्शन खाली बंदोबस्ताचे कार्य करण्यात आले .
सकाळी 8 वाजलेपासून दुपारी 4वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत KTTF चे सदस्य अविश्रांतपणे आपली सेवा बजावत होते .
चिंचवड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे साहेब आणि पोलिस निरीक्षक किशोर पाटील साहेब तसेच पोलिस निरीक्षक (वाहतूक) राम राजमाने साहेब यांनी मंदिरास भेट दिली या दरम्यान अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताची पाहणी केली आणि संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक केले
या दरम्यान अनेक पोलिस अधिकारी यांनी बंदोबस्ताची पाहणी केली
गजानन सत्संग मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे उपाध्यक्ष किशोर कदम सचिव प्रताप भगत सहसचिव सुहास जोशी तसेच विश्वस्त दत्तात्रय सावकार आणि अन्य विश्वस्तांनी कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचालित पोलीस व नागरिक मित्र चे कामाचे विशेष कौतुक केले .
या प्रसंगी कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन पोलीस व नागरिक मित्र चे सदस्यांनी गर्दीचे नियंत्रण, रांगेमध्ये दर्शन व्यवस्था ,तसेच वाहतूक नियंत्रण इत्यादी कार्य केले
श्री सुभाष मालुसरे, श्री धनंजय कुलकर्णी, KTTF चे सदस्य व मध्यवर्ती शांतता समिती आणि ग्राम रक्षक दल सदस्य यांचे मार्गदर्शन खाली सर्वांनी कार्य केले.




