महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अजितदादा पवार यांचे संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त अभिवादन

"गाडगेबाबा यांच्या दशसुत्रीनुसार वाटचाल"


मुंबई, दि. २३ :- संत गाडगेबाबा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

 गाडगेबाबा यांचे जीवन हाच एक संदेश आहे. त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला. समाजातील वाईट चालीरिती हद्दपार व्हाव्यात यासाठी प्रबोधन केले.  त्यांची दशसुत्री जनकल्याणाचा मार्ग दाखविते. या दशसुत्रीनुसारच आमची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही’ हे सांगणाऱ्या संत गाडगेबाबांनी जीवनातील प्रत्येक बाबीकडे चिकित्सक, डोळसपणे बघण्याचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज, महात्मा जोतीबा फुले यांच्यासारख्या महामानवांचे सुधारणावादी, सत्यशोधक विचार, लोकसेवेचे कार्य त्यांनी समर्थपणे पुढे नेले. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे