आपल खान्देश

पाचोरा तालुक्यात बेकायदा वृक्षतोड सुरूच 

बेकायदा वृक्ष तोडीवर कारवाई होणार का लक्ष लागून आहे


पाचोरा तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरूच!

पाचोरा सातगाव डोंगरी गव्हले रोडावर 18/2/2022 रोजी बेढ्याचे बलाढ्य झाड तोडताना सामाजिक कार्यकर्ते दिपक परदेशी यांनी पाहिले त्यांनी विचारले असता उडवा उडवीचे उत्तर मिळाल्याने संबधित कार्यकर्त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे एपीआय वाघमारे यांना फोन केला त्यांनतर वाघमारे यांनी वनविभाचे रेजंर यांना फोन करून सदर पंचनामा करण्याचे सांगितले !पंचनाम्यासाठी वनपाल ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा करून लाकडाचे भरलेले ट्रॅक्टर जमा केले आहे!दिपक परदेशी व कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे की सदर प्रकरण राजकीय नेत्याकडुन दडपण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही! तालुक्यात रोज हजारो झाडांची कत्तल करण्यात येत असून वनविभाग गाढ झोपेत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे! लाकडाचे भरलेले ट्रॅक्टर काळ्या ताडपत्रीने पँकीग करून वखार मध्ये आणतात!काही जण तर साठा करून ठेवत आहे! लाकडाचे मोठमोठे साठे जप्त करण्यात यावे!व योग्य ती कारवाई करण्यात यावी! त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हा प्रकार लवकरच बंद करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे! संबधितावर वनविभाग काय कार्यवाही करणार आहे ह्याकडे वृक्षप्रेमीचे लक्ष लागले आहे!


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे