आपल खान्देशगुन्हेगारी

पंचेचाळीस हजारांची लाच भोवली : धुळ्यात जात पडताळणी विभागातील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा जातपडताळणी समितीचा कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे

झूम मराठी

धुळे : जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळविण्यासाठी ५० हजारांच्या लाचेच्या मागणीपैकी ४५ हजार रुपये स्वीकारताना जिल्हा जातपडताळणी समितीचा कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता कागदपत्रांसह मूळ जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती धुळे येथे जमा केले होते. तक्रारदार यांना पहिल्यांदा २०१७ मध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळाले. अर्जासोबत जमा केलेले मूळ जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी जात पडताळणी समितीचे कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे त्याबदल्यात ५० हजारांची मागणी विजय वाघ यांने केली. तडजोडअंति जात प्रमाणपत्राच्या बदल्यात ४५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर ४५ हजार रुपये घेताना विजय वाघ याला मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, संदीप कदम, गायत्री पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे