आपल खान्देश

पिंपळगाव हरेश्र्वर मूक बधिर निवासी विद्यालयात 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

मूक बधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरेश्र्वर येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथे प्रजासत्ताक दिनानिमत्ताने मुखबधिर विद्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अजयसिंग परदेशी,संचालक ओम हॉस्पिटल पाचोरा यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 26 जानेवारी रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

या संयुक्त कार्यक्रमासाठी खास उपस्थतीत पाचोरा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी,उपस्थित होते डॉ. मुकेश तेली, डॉ. हृषिकेश चौधरी, डॉ. चेतन चौधरी, डॉ. कुणाल पाटील, डॉ. विशाल पाटील समवेत शाळेचे अध्यक्ष डॉ.आर बी तेली,कार्याध्यक्ष पी. बी.पाटील साहेब, देशमुख सर, माने सर, देशमुख सर, इतर सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर, शाळेचे इतर शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे