आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी चार कॉपीबहाद्दर पकडले..!

 

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर चार कॉपी बहाद्दरांना फिरत्या पथकाने पकडले. दक्षता पथके नेमली असतानाही ही घटना घडल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

बारावी परीक्षेसाठी मंगळवारी झालेल्या इंग्रजीच्या पेपरला पाचोरा शहरातील दोन केंद्रांवरील चौघांवर कारवाई केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिली. भरारी पथक पाचोरा शहरातील एम. एम. कला वाणिज्य, विज्ञान, कनिष्ठ महाविद्यालय आणि सौ. निर्मलाबाई दत्तात्रयं तावरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या असता चार विद्यार्थी कॉपी करताना आढळले. यात एम.एम.कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे एकावर तर तावरे माध्यमिक विद्यालयातील तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

त्यानंतर भरारी पथक व स्थानिक यंत्रणांनी केंद्रावर सखोल तपासणी केली. मात्र, तपासणीअंती कोणताही डमी विद्यार्थी आढळून आला नसल्याची माहिती केंद्र संचालक अर्जुन वारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, या संदर्भातील अधिकृत अहवाल सायंकाळपर्यंत परिरक्षकांकडे प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती रामनाथ कराड यांनी दिली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे