आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्रराजकीय

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून संवेधनहिन वक्तव्याचा छगन भुजबळ यांच्याकडून सभागृहात तीव्र निषेध..


नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाणी पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून संवेधनहिन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये अनुदान द्या अशी कमली केली. तसेच अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी सभागृहातून वॉक आउट करत सरकारचा निषेध नोंदविला.

 

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम 57 अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी सभागृहाचे या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना घोषित करण्यात आली नाही. सरकारकडुन तोंडाला पाने पुसली जात आहे. शेतकरी अडचणीथ सापडला असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याचे कृषिमंत्र्यांनी संवेदनहिन अशी टिपणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पुढे छगन भुजबळ म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी बाराशे रुपये खर्च येतो. मात्र कांद्याला आज पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सातशे रुपये भाव मिळत आहे. ही सध्याची परिस्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने केवळ तीनशे रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपये अनुदान देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गंभीर बाबींकडे लक्षवेधक सभागृहातून वॉक आउट करत सरकारचा निषेध नोंदविला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे