महाराष्ट्र
ताडदेव परिसरातील ‘कमला’ इमारत आग दुर्घटना ; मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाईची आदित्य ठाकरेंची घोषणा
मुंबईतील ताडदेव परिसरातील कमला या 20 मजली इमारतीला आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. या आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. दरम्यान या घटनेनंतर आज पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा केली.
• या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना सरकार ५ लाख रुपयांची भरपाई देईल.
• जखमींवर उपचार करण्यास २ रुग्णालयांनी नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र दोन्ही रुग्णालयांनी, जखमींना दाखल करून उपचार केल्याचे, मला कळवले आहे.— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2022

