महाराष्ट्रराजकीय

आर आर पाटलांच्या रोहितनं नगरपंचायतीचं एकहाती मारलं मैदान


राष्ट्रवादी काँग्रेसचा कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विजय झाला असून रोहित पाटील यांनाही विजय मिळाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला. तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

राज्यातील ९३ नगरपंचायतींच्या निवडणुकीत कवठेमहांकाळ नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. आर. आर. पाटील  यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. यासाठी रोहित पाटील यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला १० तर शेतकरी विकास पॅनलला ६ जागा मिळाल्यात. एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीतून रोहित यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

विजयानंतर नागरिकांचे आभार मानताना रोहित म्हणाला, आज आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल.मतदानापूर्वी रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्याची सर्वच ठिकाणी चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्याच भाषणानं झालं होती. यावेळी त्यांनी आपले वडील आर. आर. पाटील यांची आठवण काढली होती. “आमच्या मनातील पॅनल निवडलंय असं सर्वसामान्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसानं राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. त्यांनी पक्षाची जबाबदारी घेतलीये. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होईस. निकाल लागल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” असं ते म्हणाले होते.

रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया”निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे