बोलठाण येथील वीर जवान अमोल पाटील यांचा अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या चिंचविहिर येथील जवानाचा मृत्यू झाल्याने नांदगाव तालुक्यातील सर्व परिसरात शोककळा पसरली
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- बोलठाण येथील वीर जवान अमोल पाटील यांचा अंत्यविधी आटोपून घरी जात असताना एका जवानाचे अपघाती निधन झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चिंचविहिरे येथील नांदगावला चाललेल्या संरक्षण दलातील संरक्षण दलातल्या यांचा चांदवड-जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव परिसरातल्या विराज जवळ धोक्याच्या वळणावर अपघात होऊन त्यातील एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सोमवारी सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील संरक्षण दलातील अमोल हिम्मतराव पाटील यांच्या अंत्यविधीसाठी संरक्षण दलात कार्यरत असलेल्या गोपाल दादा दांडेकर वय वर्षे 31 व नरेश बापु घाडगे वैभव 34 हे दोघे चिंचविहिर तालुका नांदगाव येथील हे दोघे गेले होते. कोणती विधी आटोपून घरी आल्यानंतर ते सायंकाळी नांदगाव ला जात असताना विराज लॉन्स जवळच्या धोकादायक वळणावर समोरून आलेल्या ॲपे रिक्षा ची व त्यांच्या बुलेटची जोरदार धडक झाली. त्यात गोपाल दादा दाणेकर हे जागीच ठार झाले तर नयनेश बापू घाडगे गंभीर जखमी झाल्याने त्यांना मालेगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. अवघ्या पाच दिवसात नांदगाव तालुक्यात दोन लष्कर जवानाचा अपघाती निधन झाल्याने नांदगाव तालुक्यातील संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोपाल दादा दाणेकर यांचा अंत्यविधी दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी मंगळवारी सायंकाळी सात वाजता श्रद्धांजली वाहून अंत्यविधी अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भाऊ भुजबळ, नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास आण्णा कांदे आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहून गोपाल दादा दांणेकर यांना श्रद्धांजली वाहिली सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरलेली होते
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा