देश-विदेशराजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशाला उद्देशून भाषण केले. पंतप्रधान मोदींनी सत्ताग्रहण केल्यापासून सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती ते भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर विवेचन केले. देशाला उद्देशून असलेले मोदींचे हे भाषण 87 मिनिटांचे होते. पण 87 मिनिटांच्या भाषणात मोदींनी टेलिप्रॉम्पटरचा वापर केला नाही. त्यांनी लिखित मुद्दे वाचून हे भाषण केले. एरवी पंतप्रधान मोदी थेट प्रेक्षकांकडे पाहून भाषण करत असतात. पण यावेळी पंतप्रधान मोदींनी काही मुद्दे वाचून सांगितले.

महत्वाचे मुद्दे  स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री देशाला संबोधित करत होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वांना शुभेच्छा देत, मोदींनी आज राष्ट्राच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सैनिकांना अभिवादन करत आपल्या भाषणात पुढील महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

1) ७५ वा स्वातंत्र्य दिन नसून संकल्पपूर्तीचा नवा ध्यास आहे.

2) ‘सबका साथ, सबका विकास’ आता याचबरोबर आता ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ हे सूब अवलंबलं पाहिजे.

3) जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान भारतात सुरू आहे.

4) कुपोषण मुक्त भारताचा केंद्र सरकाराचा निर्धार केला आहे.

6) देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही शिक्षण घेता येणार.

7) गरिबांना रेशन दुकानात मोफत तांदळाचं वाटप करणार.

8) सहकार क्षेत्राला अधिक बळ देण्याचा निर्धार तसेच

केंद्र सरकारचा ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मची निर्मिती करण्याचा निर्धार.

9) महिला गटांनी बनवलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देणार.

10) कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना केंद्र सरकार आणणार.

11) ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ ‘वंदे भारत’ रेल्वे भारताची घोषणा करण्यात आली.

12) रेल्वे आणि जलमार्गाचे जाळं वाढविण्याचा सरकारचा निर्धार केला आहे

13) भारत ३ बिलियन डाॅलर किमतीचे मोबाईल फोनची निर्यात करतो, महत्वाची माहिती.

14) कालबाह्य झालेले नियम आणि प्रक्रिया रद्द करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन

कालबाह्य कायद्याच्या कचट्यातून देशाची सूटका करण्याची वेळ आहे.

15) मातृभाषेतून सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा केंद्र सरकारचं धोरण. गरिबांना साक्षर करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण आवश्यक

असे सर्व महत्वाचे मुद्दे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे