आपल खान्देश

जळगाव जनता सहकारी बँक पाचोरा शाखेचा १० वा व्यवसाय वर्धापन दिन उत्साहात साजरा.

 पाचोरा (झूम मराठी) जळगाव जिल्ह्यात जळगाव जनता सहकारी बँकच्या संस्थापकांनी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, सहकार माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकला आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनविण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकच्या पाचोरा शाखेचा 10 वा वर्धापन दिन मोठया उत्साहत साजरा झाला.

जळगाव जनता सहकारी बँक पाचोरा शाखेचा आज    १० वा व्यवसाय वर्धापन दिन आज रोजी येथील पाचोरा शहरातील जळगाव जनता सहकारी बँक पाचोरा शाखेतील कार्यालयांत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शाखेत सत्यनारायण पूजा ठेवण्यात आली होती.

पाचोरा शाखाधिकारी महेंद्रसिंग पाटील म्हणाले, कालानुरूप घडणारे बदल स्वीकारताना बँकेने कर्तव्यास ‘सेवा’ म्हणून स्वीकारल्याने कठीण काळातही बँक स्वतःचे अस्तित्व टिकवू शकली आणि या सेवाभावामुळेच बँकेच्या प्रगतीसह ग्राहकांचे हित जपू शकली.

यावेळी सतीश बापू शिंदे, सुनील सराफ, सुरेश पापरीकर, प्रवीण वाणी, गांगाराम तेली, सतीश मदने माजी कर्मचारी बापू महाले व पाचोरा शाखेतील कर्मचारी आणि बँकेच्या सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे