आपल खान्देशमहाराष्ट्र

गॅस दरवाढीमुळे ग्रामीण भागात, चूल वापरण्याकडे महिलांचा वाढता कल

गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. मात्र, चूल पेटविण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने सरपण पेटविण्यासाठी महिलांच्या डोळ्यांतून अश्रूधारा बाहेर पडत आहेत

झूम मराठी

जळगाव (प्रतिनिधी) गॅस दरवाढीमुळे दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्वला योजनेंतर्गंत गॅस वितरण केले. मात्र गत काही महिन्यापासून गॅसची दरवाढ होत असल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंद असल्याने उज्वला योजनेचे लाभार्थी व इतर गॅस धारक पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यावर भर देत असल्याचे चित्र दिसत आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. मात्र, चूल पेटविण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने सरपण पेटविण्यासाठी महिलांच्या डोळ्यांतून अश्रूधारा बाहेर पडत आहेत. ग्रामीण भागात जवळपास अनेक कुटुंबे सरपणाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करीत होते. चुलीवरच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे आजार होतात. हे आजार कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढत असल्यामुळे सर्वांचेच आर्थिक ‘बजेट’कोलमडत आहे. तसेच अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना सरपण गोळा करण्यासाठी रानावनात उन्हात वणवण भटकंती करावी लागते. यामुळे वनसंपदा ही धोक्यात आल्याने वन्यप्राणी सुध्दा मानवी वस्तीत वावरताना दिसतात. तसेच सरपन ओले असल्यामुळे धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या हेतुने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस वाटप करण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ गोरगरिबांची डोकेदुखी ठरत आहे. सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. उज्वला योजनेंतर्गंत गॅस कनेक्शन मोफत मिळाले. काही महिने  सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडीही मिळत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे