नांदगाव नगरपालिकेत विलीनीकरण करण्यास क्रांतीनगर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रखर विरोध
नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव नगरपालिकेत क्रांतीनगर ग्रामपंचायतीचा विलीनीकरण करण्यास ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेत विलीनीकरणास ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला असून या ग्रामपंचायतीचे नांदगाव नगरपालिकेत समावेश,,(विलीनीकरण) करण्यात येऊ नये असा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला.

नगरपालिकेच्य शेवटच्या सभेत झालेल्या सभेत नांदगाव नगरपालिकेत हद्दवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला असून क्रांतीनगर चाही त्यात समावेश आहे. तसेच नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी क्रांतीनगर ग्रामपंचायतीला पत्र क्रमांक जावक क्रमांक नांदगाव ३००९/२०२१ च्या पत्राचे क्रांतीनगर ग्रामपंचायतीने दिनांक 3 जानेवारी २०२२ रोजी घेतलेल्या ग्रामसभेत सविस्तर वाचन करण्यात आले. सदर विषयावर ग्रामसभेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले की, आपली ग्रामपंचायत ही वाडी वस्तीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यामुळे वाडी वस्ती मधील रस्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. जर नांदगाव नगरपालिकेत क्रांतीनगर ग्रामपंचायतीचा समावेश झाल्यास भविष्यात देखभाल व दुरुस्ती होणार नाही, तसेच नगरपालिकेचे करांचे दर देखील सर्वसामान्य ग्रामस्थांना परवडणारी नाहीत. नागो नगरपालिकेचा कचरा जास्त प्रमाणात क्रांतीनगर टाकला जाईल व त्यामुळे दुर्गंधी रोगराई वाढेल,
तसेच काही ग्रामस्थांनी ग्रामसभेत म्हटले की जर आपली ग्रामपंचायत नांदगाव शहरालगत आहे. क्रांतीनगर ग्रामपंचायतीचा नांदगाव नगर पालिकेत समाविष्ट झाल्यास पाणी, रस्ते, विज उपलब्ध होण्यास मदत होईल व जमिनीच्या किमतीत वाढ होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होईल. तरी सदर विषयावर उपस्थित ग्रामस्थांनी ऊहापोह ग्रामपंचायत क्रांतीनगर या ग्रामपंचायतीचे नांदगाव नगर परिषदेमध्ये विलीनीकरण रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. असून या ग्रामपंचायतीचे ग्रामस्थांनी बहुमताने प्रखर विरोध केला असून जर या ग्रामपंचायतीचे विलीनीकरण केल्यास आम्ही अनेक आंदोलन छेडू असा इशाराही येथील ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.
क्रांतीनगर ग्रामपंचायतीने घेतलेल्या 3 जानेवारी २०२२ रोजी घेतलेल्या ग्रामसभेच्या ग्रामसभेतील विषय क्रमांक दोन व ठराव क्रमांक दोन च्या ठरावावर सूचक म्हणून श्री शिवाजी दत्तात्रय मोकळ तर अनुमोदक म्हणून श्री सुरेश मधुकर गायकवाड हे असून ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे या ठरावावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सह्या आहेत.
सदर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचे वेळेस तकदीर सरोदे, अरुण भोसले, शरद पाटील, अनिल पाटील, अशोक गांगुर्डे, दिनकर जाधव, योगेश मोकळ, शरद सोनवणे, व इतर ग्रामस्थांनी क्रांतीनगर ग्रामपंचायत ही नांदगाव नगरपालिकेत समावेश करण्यास प्रखर विरोध केला असून या ग्रामसभेत एकमताने समावेश करण्यात येऊ नये अशा प्रतिक्रिया या ग्रामसभेत केल्या होत्या.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा