आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा शहरातील दानशूर मुकुंदआण्णा अनंतात विलीन, साश्रू नयनांनी अखेरचा निरोप..


  • दिलीप जय परदेशी

पाचोरा शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच आशीर्वाद बिल्डर्सचे संचालक मुकुंद (अण्णा) बिल्दिकर मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याने पाचोरा शहरातील बिल्दिकरप्लाझा या बंगल्यावर सकाळ पासून नागरिकांनी गर्दी केली होती आज रात्री त्यांना पाचोरेकरांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

मुकुंद (अण्णा) बिल्दिकर यांचे दुःखद निधन झाल्याचे कळताच नागरिकांना धक्का बसला. पाचोरा शहरातील बिल्दिकरप्लाझा  बंगल्यावर सकाळ पासून नागरिकांनी गर्दी केली होती, त्यांचे पार्थिव येण्याची शोकाकुल नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिकांच्या डोळे पानावलेले दिसत होते, त्यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्तेनां आण्णानीं खूप जपले होते खूप प्रेम दिले होते सर्व कार्यकर्ते एकमेकांना धीर देत रडत होते. पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत होती शहरभर भावपुर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लागले होते.

मुंबई वरून दुपारी त्यांचे पार्थिव आले त्यांच्या मुखदर्शनासाठी त्यांचे पार्थिव घराबाहेर ठेवण्यात आले शोकाकुल नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले त्यानंतर सजविलेल्या गाडीवर त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते गांधी चौक या मार्गे शहरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा आदित्य यांनी अग्निडाग दिला.

अनेकांनी श्रद्धांजली वाहिली, अनेकांनी दुःख व्यक्त करून त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. मुकुंद (अण्णा) बिल्दिकर एक व्यवसायिक, राजकारणी तथा समाजकारणी होते. सर्वसामान्य कार्यकर्ते, सामान्य माणसांविषयी बांधिलकी, पत्रकारांवरील प्रेम, गरिबांविषयी कळवळा असणारा एक दानशूर माणूस होता. राजकारणात ही त्यांच्याकडे कुठले ही पद नसतांना त्यांच्या नावाचा दबदबा होता. आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा माजी नगराध्यक्ष छोटू गोहील हे त्याचे जवळचे मित्र होते. व्यवसाय पलीकडे  समाजकारणात त्यांच्या नावाचे वलय होते. राजकारणात त्यांचे मोठे नाव होते,वाईटला वाईट म्हणण्याचे धैर्य आणि चांगल्याला चांगले म्हणण्याचे औदार्य त्यांच्यात होते, अशा भावना अनेकांनी व्यक्त करून त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे