आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

गरीब धनगरांना रुग्णवाहीका उपलब्ध करून द्या अशी विनंती केली

खासदार पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे साहेबांकडे उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ व ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती तर्फे रुग्णवाहिकिची मागणी करण्यात आली

महेंद्र परदेशी 

कल्याण >>>मागील एक वर्षा पासून कोवीड 19 महामारी चालू आहे कित्येक धनगर समाज बाधवांचे घर उध्वस्त झाले आहेत. घरातले करते धरते या महामारी मध्ये सोडुन गेले. परिवारातील लोकांचे काम धंदे नोकरी गेली जगण्यासाठी पैसा नाही. त्या मध्ये परत कोवीड 19 ( कोरोना ) हे परत जोमाने डोक वरती काढतो आहे घरा मध्ये कोणीना कोणी आजारी पडत आहे. आई, वडील भाऊ, बहीण, पत्नी मुलं तर मग करायचं कायदवाखान्याच बिल ऍम्ब्युलन्स खर्च गरीब माणूस कर्ज काडून असाही मरत आहे त्या साठी श्री ज्ञानेश्वर परदेशी यांनी लोकसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे साहेबांकडे उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ व ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती तर्फे रुग्णवाहिकिची मागणी करण्यात आली. विविध प्रश्न मार्गी लावाण्याची मागणी केली.

काही दिवसांत रुग्णवाहीका लवकर उपलब्ध होणार आहे असे विकासजी महात्मे यांनी जाहीर केले. या वेळी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ परदेशी, नवी मुंबई अध्यक्ष संदिप पांढरे, युवा ठाणे जिल्हा अध्यक्ष तुषार धायगुडे, तसेच उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष महेंद्र गोकुळ परदेशी, ठाणे शहर अध्यक्ष अजय खंडू हाके,सुधाकर गेंदा परदेशी, इतर समाज बांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे