आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा भडगाव तालुक्यात गोर गरिबांचे तारणहार मुकुंद आण्णा हरपला..

पाचोरा शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच आशीर्वाद बिल्डर्सचे संचालक मुकुंद (अण्णा) बिल्दिकर यांचे  रात्री १२ वाजेच्या सुमारास मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याने पाचोरा भडगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होता आहे.

पाचोरा शहरात दिलदार व्यक्तीमत्व म्हणून यांच्याकडे पहिले जायचे अडो नडो कोणालाही मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता राजकारणात ही त्यांच्याकडे कुठले ही पद नसतांना त्यांच्या नावाचा दबदबा होता. आमदार किशोर अप्पा पाटील हे त्याचे जवळचे मित्र होते. व्यवसाय पलीकडे  समाजकारणात त्यांच्या नावाचे वलय होते. राजकारणात त्यांचे मोठे नाव होते, तालुक्यात गोर गरिबांचे ते तारणहार मानले जात होते. दानशूर व आलेल्या सर्वांना मदत करण्याची भावना असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती, त्यांचा जाण्याने स्थानिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव मुंबई येथून शवविच्छेदन करून आज पाचोरा येथे पोहचणार असून संध्याकाळी अंत्यसंकार केले जाणार आहेत.



बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे