ब्रेकिंग

देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले १०० अनाथ मुलांचे पालकत्व…

केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट, हिंगणा, नागपूरच्या वतीने, माजी महापौर संदीप जोशी यांच्या ‘सोबत’ या प्रासंगिक आणि सामाजिक आशय असलेल्या उपक्रमाचा आज शुभारंभ केला. माजी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

मा. नितीनजी गडकरी यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती केली. आदिवासींसाठी एकल विद्यालय, बांबू प्रकल्प असे अनेक सामाजिक प्रकल्प त्यांनी प्रारंभ केले. राजकारणात एक वेगळेपण त्यांनी जपले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात कोविडच्या काळात सुद्धा त्यांनी मोठे काम केले कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सकस आहार अशा विविध बाबतीत पुढाकार घेणारा हा संदीप जोशी यांना ‘सोबत’ उपक्रम अतिशय वाखाणण्यासारखा आहे

 

Advertising

संदीप जोशी यांनी असे अनेक प्रकल्प चालविले. त्यामुळे हाही प्रकल्प योग्य हाती आहे. या संस्थेकडे आलेल्या पहिल्या 100 बालकांच्या नोंदणीचे पालकत्त्व मी स्वीकारत आहे. याशिवाय, माझ्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून जी नोंदणी होईल, त्यांचीही संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक बहुमुल्य विधायक कार्य केले आहे. कारण ज्या लहान मुलांच्या डोकीवरचा हात निसटला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे