आपल खान्देशमहाराष्ट्रसखी

वैशालीताईच्या प्रचारात उतरल्या रिद्धी आणि निधी..

  • दिलीप जय परदेशी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात पाचोरा भडगाव मतदार संघात मोठे घमासान सुरु पाचोरा भडगाव मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आमने-सामने आहे, त्यात दिग्गज उमेदवार रींगणात उतरले आहेत त्यांच्या समोर नवखी वैशाली सूर्यवंशी ह्या ठाकरे गटातून निवडणूकित पहिल्यांदा सामोरे जात आहे त्यात त्यांच्या मदतीसाठी धावून आल्या आपल्या मुली कु रिद्धी आणि कु निधी ह्या प्रचार करत संपूर्ण मतदार संघ चाळून काढत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत, त्याचमुळे सगळीकडेच कु. सिध्दी, कु. निधी सुर्यवंशी यांचे कौतुक होत आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी परिवर्तनाचा नारा बुलंद करत जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांना जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

वैशालीताई सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीसह मतदारांचे खंबीरपणे पाठबळ मिळत आहे. त्यातच कु. सिध्दी आणि कु. निधी सूर्यवंशी ह्या मैदानात उतरल्या आहेत. कु. सिध्दी या वैशालीताईंच्या ज्येष्ठ कन्या आहे. त्या बायोटेक्नोलॉजी विषयात फर्ग्युसन कॉलेज येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. त्या समाजसेवेत सक्रीय झाल्या आहेत. वैशालीताई सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित सभेत ‘त्या’ व्यासपीठावर दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली आहे. पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये जाऊन आपली आई वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासाठी दोन्ही बहिणी प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे