महाराष्ट्र

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; दहा ठार

अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर जवळ नंदगोपाल डेअरी समोर आज (दि. ०९) सकाळी ८.३० वा. लातूर – औरंगाबाद बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आकरा जण जागीच ठार आणि दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

10 प्रवाशी व एक कंडक्टर असे एकूण आकरा जन जागेवरच मयत झाले. बसचालकाला कुठलीही ट्रेनिंग न देता बस प्रशासनाने त्याच्या ताब्यात देऊन औरंगाबादहून लातूरकडे प्रवाशी भरून एसटीच्या अधिकार्‍यांनी लातूरकडे रवाना केली होती. अशी प्राथमिक माहिती मिळते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे