ब्रेकिंग
शिक्षण सेवक भरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदिल, 6,100 पदे भरणार
ZOOM MARATHI NEWS WEB MEDIA
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. माझ्या आग्रहाला मान देत @CMOMaharashtra जी, @AjitPawarSpeaks जी आणि @bb_thorat जी यांनी ह्या भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. मनापासून आभार! pic.twitter.com/hY5LliGAel
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 8, 2021
राज्यतील सुमारे 6,100 शिक्षण सेवकांची पदे आता भरणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया ‘पवित्र प्रणाली’च्या माध्यमातून राबवली जाणार असून ती अतिशय पारदर्शक असेल, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.





