महाराष्ट्रराजकीय
तीन महिने राजकारणापासून दूर राहणार असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकरानी केले घोषित
वैयक्तिक कारणासाठी तीन महिने राजकारणापासून दूर राहणार असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पण ८ जुलै रोजी त्यांच्यावर तातडीची बायपास सर्जरी करण्यात आल्याचं वंचित बहुजन आघाडीकडून जाहिर करण्यात आलंय. ॲड. आंबेडकर आयसीयूमध्ये आहेत. काही दिवस त्यांना हाॅस्पिटलात आराम करावा लागणार आहे. सद्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.
अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसार माध्यमाना बोलताना सांगितले.



