शिंदे साहेब! भविष्य चांगले नाही..
शिवसेना राजकीय पक्ष नाही.मराठी जनसंरक्षक संघटना आहे.त्यात यशस्वी झाली,हेच खरे.बाकीचे खोटे.तरीही आपला माणूस, मराठी माणूस म्हणून मुंबई महापालिका तसेच जवळपास चे महानगरात राजकीय लोकप्रतिनिधी निवडून दिलेत.पुढे राजकीय महत्त्वाकांक्षा झाली.महाराष्ट्रात आमदार खासदार निवडून आले.भाजपच्या युतीने महाराष्ट्रात सत्तेवर आले.एकहाती सत्ता नाही.जशी दिल्लीत आप ला,बंगालमधे तृणमूल ला, आंध्र मधे वायएसआर ला,तेलंगणात टीएसआर ला मिळाली.कारण त्यांचेकडे राजकीय विचारधारा आहे.तशी राजकीय विचारधारा शिवसेनेकडे नाही.मुळातच तशी विचारधारा नसतांना आम्ही ठराविक लोक शिवसेनेला मतदान करतो.
फुटणे, गद्दार होणे वगैरे प्रकार शिवसेनेत असणे स्वाभाविक आहे.राजकारण, लोकसेवा हा उद्देश नाही.सत्ता आणि तिजोरी हाच हेतू दिसतो.फुटणे सवयीचे झाले आहे.आता तसा खेद खंत वाटत नाही.आपण एकमेकांना गद्दार म्हणवून काही काळ राग व्यक्त करतो.राग थंड झाला कि बंड ही थांबते.शिवसेनेच्या नगरसेवक, आमदार खासदाराला कोणीही लालीपॉप दाखवते.ते बळी पडतात.सांगतांना कारणे वेगवेगळी सांगितली जातात.आत्ताच शिंदे गटाने भाजपच्या राष्ट्रपती उमेदवाराला समर्थन दिले.म्हणे हे इडी चे बळी आहेत. ठाकरेंनीही तेच केले.मग काय, ठाकरेंनी यशवंत सिन्हावरचा राग काढला का? कुठेही वैचारिक धागा जुडत नाही.
जळगाव जिल्ह्यातील आमदार श्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्री पद देऊ नये म्हणून आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे चार लोक मुंबई मलबार हिल वर नंदनवन बंगल्यावर शिंदे साहेबांना भेटलो.अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत फोनाफोनी केली.पण आत प्रवेश नाही.आमच्या समोरच घाणेरडे ,गुंड , गुन्हेगार आत जातांना पाहून आमचे पित्त खवळले.रागात येऊन व्हिडिओ क्लीप बनवली.व्हायरल केली.पोलिसांनी रिपोर्टींग केली.तेंव्हा कुठे आत बोलवले, बाहेर उभे केले,आतील तमाशा पाहिला म्हणालो,
शिंदेसाहेबांना सांगा, जळगाव हून शिवराम पाटील आले आहेत.आम्ही रेती मातीचा मक्ता किंवा दारुचा परवाना मागत नाहीत. तर राजकीय मिशन घेऊन आलो आहोत. वेळ असेल तर सांगा, नाहीतर परत निघतो, जळगावला.
आत बसलेली दाढीवाले,टिळेवाले,कडीवाले कुठल्याही अंगाने राजकीय वाटत नाहीत. शिंदे साहेब अशाच लोकांच्या मधे व्यस्त असतील तर आम्ही जातो परत.
“तेंव्हा आमचा राग पाहून आमच्या भोवताली पोलिस आणि कमांडो यांनी गराडा केला. आधिकारी म्हणाले, अहो ,हळू बोला.आम्ही अधिकारी आहोत.रेतीमातीवाले नाहीत.
“तर मग,कळत नाही का तुम्हाला, कोणाला अडवायचे आणि कोणाला सोडायचे?”
काका,तुमची भेट करतो. या आत बसा.. तेंव्हा आम्ही नमते घेतले. आत बोलवले. बसवले.थंड पाणी,गरम चहा पुरवली. सात मिनिटे शिंदे साहेबांशी बोलणे झाले. ते हेच कि,“आम्ही जळगाव जिल्ह्यातून आलो आहोत. आमच्या जिल्ह्यातील गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद देऊ नये.आधी त्यांना अपहाराच्या आरोपातून मुक्त होऊन जाऊ द्या. तोपर्यंत नको.” शिंदेसाहेबांनी मला अडवले,”असे तर अनेकांवर अपहाराचे आरोप आहेत. तर मग मंत्री कोणाला बनवू ? जर आधीच माहिती असेल कि ,हा माणूस भ्रष्ट आहे. तरीही मंत्री बनवत असाल तर चुकीचे आहे. तुमचा हेतू चांगला नाही. असा दोष लागेल. आमच्या जळगाव जिल्ह्यातील आणखी चार आमदार शिवसेनेचे आहेत. पैकी चिमणराव पाटील व किशोर पाटील ईच्छुक आहेत.”
आमचा हेतू माहिती झाल्यावर मुंबई पोलिसांनी आम्हाला चांगले सहकार्य केले. त्यांची ईच्छा होती कि,या काकाला आत सोडले पाहिजे.जसा मी पोलिसांच्या मनातील खंत बोलणार होतो.
दोन वाजता शिंदे साहेब मलबार हिल वर नंदनवन ला आले.तेंव्हा पोलिसांनी दोन्ही कडील रस्ते अडवले. बस,टैक्सी,माटरसायकल, पादचारी सर्वच अडवले.तेंव्हा एक मराठी महिला पोलिसांना म्हणाली,”कशाला अडवलात रस्ता?”“ अहो ताई, मुख्यमंत्री साहेब येत आहेत.म्हणून अडवले.”
“कोण मुख्यमंत्री?ते येणार म्हणून काय आम्हाला थोपवून ठेवणारं का? त्यांना सांगा,मागच्या दाराने या म्हणावं.जसे मागच्या दाराने सरकार बनवलं.आमची वाट नका अडवू.आम्हाला आमची कामे वेळेवर करावी लागतात.ते असले नसले तरी काय फरक पडतो मुंबईत? “इतके बरे झाले कि, माजी वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बंगल्यावर बसलेले आहेत,असे या महिलेला माहिती नव्हते.जे आम्हाला आत गेल्यावर दिसले. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना तोच संदेश आमने-सामने देण्यासाठीच तर जळगाव हून मुंबईत हेलपाटे घालून आलो होतो.कि , आमच्या जिल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटलांना मंत्रीपद देऊ नका.अखेर भेटले.आम्ही काय सांगायचे ते सांगितले.ती महिला काय बोलायची ती बोलली.आम्ही आणि पोलिसांनी ऐकले. शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार,हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते.पण झालेत.किमान उद्धव ठाकरे साहेबांच्या चुका त्यांनी करू नयेत.गुंड,पुंड,घाणेरडी माणसे मंत्री बनवू नयेत.पोलिस,ती महिला, आणि आम्ही अडीच वर्षांनी भेटणार आहोतच,मतपेटीच्या माध्यमातून.
शिवराम पाटील – मोबाईल ९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.
Disclaimer : वरील लेख एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. झूम मराठीच्या टीम अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व #झूम मराठी स्वीकारत नाही.



