आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका२०२५चे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते प्रकाशन..
पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन
पाचोरा तालुक्यातील पत्रकारांचे आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका २०२५चे प्रकाशन पाचोरा विधानसभेचेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मोठया दिमाखात पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील आय लव्ह पाचोरा पत्रकार दिनदर्शिका २०२५चे प्रकाशन पाचोरा विधानसभेचेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मोठया दिमाखात प्रमुख पत्रकारांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा आज संपन्न झाला यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे सल्लगार लक्ष्मण आबा सूर्यवंशी, जेष्ठ पत्रकार मिलिंद सोनवणे, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर अध्यक्ष प्रवीण बोरसे, शहर उपाध्यक्ष प्रशांत येवले, शहर संघटक दिलीप परदेशी, शहर सचिव निखिल मोर, जावेद शेख, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील पत्रकार समाजउपयोगी कार्यक्रम व उपक्रम करत असतात. आय लव्ह पाचोरा पत्रकार दिनदर्शिका २०२५चे पहिले वर्ष प्रकाशन करण्यात आले असून, सर्वांशी संपर्क साधणे, 12 पानांवर जाहीरातींसह विविध प्रकारची माहिती संकलीत करणे, संकलीत झालेली माहिती दिनदर्शिकेत उत्तम प्रकारे छापुन आणणे ही कामे सोपी नाहीत. त्यासाठी पत्रकार प्रवीण बोरसे आणि पत्रकार दिलीप परदेशी यांना जबाबदारी पार पाडली. परिश्रम घेवून तालुक्या सह दिनदर्शिकेत पौराणिक, धार्मिक, सण ,उत्सव थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरण,ऐतीहासिक सामाजिक, माहिती असलेली दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे .
आय लव्ह पाचोरा नावाप्रमाणेच तालुक्यातील प्रमुख पत्रकारांनी एकत्र येत एक जूट दाखवली. त्यामुळेच ही दिनदर्शिका आज प्रकाशित होत आहे, असे म्हणत आमदार किशोर पाटील यांनी आय लव्ह पाचोरा पत्रकार दिनदर्शिका २०२५चे कौतुक करत व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुनील शिंदे, यांनी देखील दिनदर्शिका प्रकाशनाला शूभेच्छा व्यक्त केल्या.



