ब्रेकिंग

जळगावात क्राईम ब्रांचचे असल्‍याचे सांगत दोघांना लुटले

जळगाव : क्राईम ब्रांचचे  अधिकारी असल्याचे सांगून पिंप्राळा तसेच इच्छादेवी चौक परिसरात दोन जणांना लुटल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. अर्धा तासाच्‍या अंतराने या दोन्ही घटना घडल्या आहेत.

फसवणूक करण्याचे  वेगवेगळे प्रकार सध्‍या होत आहे. नागरीक देखील सहजतेने विश्‍वास ठेवत त्‍यास बळी पडत आहेत. मात्र आता थेट क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्‍याचे सांगून झडती घेण्याचे सांगून लुबाळणूक करण्याचा प्रकार आज शहरातील भर रहदारीच्‍या रस्‍त्‍यावर घडली. आजच्‍या या प्रकारामुळे आता नेमका विश्‍वास ठेवायचा कसा असा प्रश्‍न देखील निर्माण होत आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरामधील भवानी मंदिराजवळ प्रदीप पुरूषोत्तम सोमानी (वय ५१) यांना क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून झडती घ्यायची असल्‍याचे सांगितले; विश्‍वास बसण्यासाठी ओळख पत्र देखील दाखविले. यादरम्यान सोमानी यांच्या गळ्यातील वीस ग्रॅमची सोन्याची साखळी, तीन हजार रुपये रोख लांबवून दुचाकीवरुन चोरटे पसार झाले.

अर्धा तासातच दुसरी घटना

पिंप्राळा येथे घडलेला प्रकार इच्छा देवी चौकात नजीक असलेल्या बेंद्रे हॉस्पिटलजवळ घडला. सुनील पितांबर चौधरी (वय ६०, रा. आयोध्यानगर) याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी, ९ ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम अंगठी असा ऐवज लुटून नेला आहे. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळासह परिसरात सीसीटीव्हीची पाहणी केली आहे. तसेच संशयित दोघांपैकी एकाचे रेखाचित्र जारी केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे