आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

लोहारा विद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


  • दिलीप राजपूत लोहारा 

लोहारा (झूम मराठी) धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड द्वारा संचलित डॉ जे जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे राष्ट्रमाता जिजामाता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एन दांडगे मॅडम होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माता व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांनी केलेले कार्य व स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगत पर भाषण सादर केली कल्याणी मनोज सरोदे या विद्यार्थिनीने राष्ट्रमाता जिजाऊ माता यांची वेशभूषा धारण केलेली होती त्यामुळे ती आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू बनलेली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एन दांडगे मॅडम यांनी आपल्या भाषणातून जिजाऊ माता यांनी आदर्श युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज कसे घडवले याविषयी मार्गदर्शन दिले स्वामी विवेकानंद यांना युगपुरुष का म्हणतात याविषयी आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आभार वाय पी वानखेडे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे