आपल खान्देश

धरणगांव तालुक्यातील बाभूळगांवात एकलव्य संघटना शाखा नामफलक अनावर संपन्न..

धरणगांव तालुक्यातील बाभूळगांव येथे एकलव्य संघटना शाखा नामफलक अनावर व समाज प्रबोधन कार्यक्रम मोठया उत्साहात झाला परिसरातील बांधव मोठया संख्येने  उपस्थित होते भिल समाज बांधवांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात एकलव्य संघटना आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. जळगाव जिल्ह्यातील गावा गावात आदिवासी पाड्यावर शाखा स्थापन करून एकलव्य संघटना न्याय देण्यासाठी झटत आहे. धरणगांव तालुक्यातील बाभूळगांव येथे एकलव्य संघटना शाखा नामफलक अनावर व समाज प्रबोधन कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे तसेच प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

ह्यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी उपस्थित भिल समाज बांधवांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, विषयावर मार्गदर्शन केले तसेच धरणगांव तालुक्यातील पसठाना, बाभळे गावाला भेट देत नियोजन दौरा केला ह्या कार्यक्रम प्रसंगी सोबत एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष संजूबाबा सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, अ.सेल जिल्हाध्यक्ष ऋषीदादा सोनवणे, जिल्हा संघटक, पिंटूभाऊ सोनवणे युवा जिल्हा संघटक, सुभाष मालचे धरणगांव तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार उपसमिती सभापती, संजय पवार पारोळा तालुकाध्यक्ष. सचिन सोनवणे धरणगांव युवा तालुकाध्यक्ष, विरेंद्र मालचे उपतालुकाध्यक्ष, अजय सोनवणे टायगर गृप तालुकाध्यक्ष श्री. करण सोनवणे तालुका संघटक श्री. नारायण मोरे सोशल मीडिया तालुका प्रमुख श्री. भटू अहिरे तसेच बाभूळगांव शाखा कमिटीसह गावातील आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे