ब्रेकिंग

नाशिक शहरात जोरदार पाऊस!!

नाशिक शहरात रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यापासून नाशिकमध्ये वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. कधी तपमान १२ अंशांपर्यंत खाली येते तर कधी हेच तपमान अचानक ७-८ अंशांची घट होऊन वाढतेही यामुळे आगामी रब्बी हंगामावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे

नाशिकमध्ये थंडीचा कडाका पुढील आठवड्यात जाणवेल अशी माहिती हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर  यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले की, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरनंतरच थंडीचा कडाका वाढेल.

सध्या दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. त्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पाऊस होईल.

हवामान अभ्यासक औंधकर यांच्या अंदाजानुसार सायंकाळी नाशकात मुसळधार जलधारा कोसळल्या. दरम्यान, दिवसभर तपमान वाढलेले होते. दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री अचानक पावसाने मुसळधार हजेरी दिल्यामुळे वातावरणात गारठा वाढला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे