ब्रेकिंग

माझ्याकडेही भरपूर मसाला आहे – नारायण राणे

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झालीय. त्यावेळी रत्नागिरीत बोलताना राणे यांनी टीका करताना शिवसेनेची जुनी प्रकरणं बाहेर काढण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचं नाव मात्र घेतलेलं नाही.

“नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न नका करू. मी एक-दोन नव्हे तर 39 वर्षं सोबत होतो. माझ्याकडंही तुमच्याबाबत पुष्कळ मसाला आहे,” असं नारायण राणे म्हणालेत.

या सर्वानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष अधिक पेटत जाणार असल्याची चिन्हं आहेत. राणेंची टीका आणि त्यानंतर त्यांच्या अटक प्रकरण ताजं असतानाच नारायण राणेंनी नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.

दरोडेखोराप्रमाणे अटक केली

“एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तशी केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली. दोनशे-अडीचशे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. काय पराक्रम आहे,” अशा शब्दांत नारायण राणे यांनी उपहासात्मक टीका केली.

महाराष्ट्रातील जनता सध्या अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, पूर परिस्थिती कोणालाही मदत मिळाली नसल्याचा आरोप राणे यांनी सरकारवर केला.

“जुन्या गोष्टी काढणार असं म्हटले होते. दोन वर्षं झाली शोध घेत आहेत. पण त्यांना काही मिळालं नाही. पण आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय? जया जाधव यांची हत्या झाली. त्याचं कारण काय? अशी प्रकरणं आम्हालाही माहिती आहेत,” असं नारायण राणे म्हणालेत.

वहिनीवर अॅसिड हल्ला कोणी केला?

पुढं बोलताना राणे यांनी नाव न घेता गंभीर आरोप केला. “आपल्या भावाच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं,” हेही माहिती असल्याचं राणे म्हणाले. राणे यांनी अशाप्रकारे टीका करताना संस्कारच तसे असल्याची टीकाही केली. तसंच अशी अनेक प्रकरणं माहिती आहेत ती टप्प्या टपप्यानं बाहेर काढणार आहे, असं राणे म्हणाले. सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन यांच्या केस संपलेल्या नाहीत मी केंद्रामध्ये मंत्री आहे, याची जरा आठवण ठेवा असंही ते म्हणाले.

“रिस्ट्रिक्शन किती दिवस ठेवणार. आम्हालाही तोच कायदा आहे. त्यामुळे दादागिरी करू नका तो तुमचा पिंड नाही. तुम्ही आम्हाला जवळून पाहिलं आहे,” असा धमकीवजा इशाराच राणेंनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे