देश-विदेश

Sputnik V लशीची पहिली खेप भारतात दाखल,

रशियाच्या Sputnik V या लशीचे डोस भारतात दाखल झाल्यानं भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे.

 सरकारनं स्पुतनिक व्ही या रशियन लसीला परवानगी दिल्यानंतर शनिवारी दुपारी भारतात या लशींची पहिले खेप पोहोचली आहे. शनिवारी दुपारी हैदराबादेत स्पुतनिक व्ही लसींचे डोस घेऊन आलेलं विमान दाखल झालं. त्यामुळं भारतातल्या लसीकरण मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे.

केंद्र सरकारने 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र लसींच्या तुटवड्यामुळं संपूर्ण देशभरात अपेक्षित वेगानं ही लसीकरण मोहीम सुरू झाली नाही. अनेक राज्यांमध्ये तर 45 वर्षांपुढील वयोगटाच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीही लसीचे डोस उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळालं होतं. अशा परिस्थितीत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस येण्याची सर्वजण वाट पाहत होते. शनिवारी दुपारी या डोसची पहिली खेप हैदराबादेत दाखल झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे