आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पिपंळगाव ग्रामपंचायत अजब कारभार घंटा गाडी धूळ खात, आणि गावात अस्वछता व कचरा

भडगाव (झूम मराठी) मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भडगाव तालुक्यातील पिपंळगाव बु|| थडीचे ग्रामपंचायतने घंटा गाडी खरेदी करून गावातील कचरा जमा करायचे काम काही दिवस सुरु होते आता मात्र घंटा गाडी कुठेच कचरा जमा करायला दिसत नाही. सदर घंटा गाडी ही गावा बाहेर धूळ खात पडली असून ती शेवटची घंटा मोजत आहॆ का? की शोपीस म्हणून ठेवली आहॆ. असा प्रश्न नागरिकांना पडला आहॆ.

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बु. ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार कित्येक दिवसापासून पिंपळगाव गावात कोणत्याही प्रकारची स्वच्छता करताना दिसून येत नसून यामुळे गावात अस्वच्छता निर्माण होत असून गावात विविध रोगराई तसेच आजारांना आमंत्रण देण्याचे काम पिंपळगाव बु|  ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी यांच्याकडून डोळे झाक पद्धतीने काम करण्यात येत असून याकडे प्रशासन लक्ष देईल का?

ग्रामपंचायतने घंटा गाडी खरेदी करून गावातील कचरा जमा करायचे काम काही दिवस सुरु होते आता मात्र घंटा गाडी कुठेच कचरा जमा करायला दिसत नाही. सदर घंटा गाडी ही गावा बाहेर धूळ खात पडली असून ही गाडी सध्या गावाच्या बाहेर एक स्वच्छता अभियानाचे जाहिरात करण्यासाठी शोपीस म्हणून ठेवलेली आहे. असे चित्र सध्या दिसून येत आहे. याचा अर्थ जनतेचा पैसा फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्याच खर्चासाठी केला जात आहे की काय असा प्रश्न सध्या नागरिकांना तसेच रहिवाशांना पडलेला आहे. व गावातील स्वच्छता ही फक्त वाऱ्यावरच बघावयास मिळत आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांची दखल घेतील की नाही असा प्रश्न सध्या पिंपळगाव ग्रामपंचायत रहिवाशांना तसेच नागरिकांना पडलेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे