नाशिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआयचा पुरस्काराने सन्मान…
ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआयचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस सर्वोत्कृष्ट आयटीआयचा पुरस्कार रुपये पाच लाख, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव आशिष कुमार सिंह आयुक्त आयुक्त एन. रामास्वामी तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पी एम वाकडे उपस्थित होते संस्थेच्या वतीने हा पुरस्कार पाचोरा येथील रहिवासी प्राध्यापक मनीष बाविस्कर यांचे लहान बंधू व देशमुखवाडी परिसरातील यादव परिवाराचे जावई तथा संस्थेचे प्राचार्य दीपक बाविस्कर, संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ निर्देशक संजय मस्के यांनी स्वीकारला.


