आपल खान्देश

चाळीसगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या पुतळ्याच्या चौथाऱ्या खाली दोनअस्थी कलश सापडले

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलश पुतळ्याचा पाया खोदकाम करताना सापडल्याने चाळीसगावकर झाले धन्य

चाळीसगाव (प्रतिनिधी ) चाळीसगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तिस लाख रुपये खर्चाचे पुनर्स्थापना काम सध्या येथे सुरू असून आज या पुतळ्याच्या पाया खोदकाम करत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या पुतळ्याच्या चौथाऱ्या खाली दोन पवित्र अस्थी कलश सापडल्याने आंबेडकरी जनतेच्या उत्साहाला उधाण राहिले नाही. शेकडो अनुयायी,पदाधिकारी यांनी या पवित्र अस्थी कलशाचे दर्शन घेतले. यावेळी उमंग महिला समाजशिल्पी महीला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ संपदाताई पाटील,शहराच्या नगराध्यक्षा सौ. आशालता चव्हाण, पुतळा परिसराच्या नगरसेविका सौ. सायलीताई जाधव यांच्या हस्ते विधीवत पूजा करून हे पवित्र अस्थीकलश नव्याने बांधण्यात आलेल्या चौथाऱ्याच्या जागी पुन्हा ठेवण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने वातावरण “भिममय” झाले होते.

दोन अस्थी कलश

या पवित्र दोन अस्थी कलशांवर असलेला उल्लेख स्पष्ट वाचता येत आहे.एकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती असे नाव कोरलेले आहे. तर मोठया अस्थी कलशावर इंद्रायणी पुंडलीक वाघ असे नाव व त्या खाली 18/12/59 अशी तारीख दिसते आहे. इंद्रायणी पुंडलिक वाघ सायगाव या चाळीसगावातील चौधरीवाड्यापुढे असलेल्या भीमनगर परीसरात राहत होत्या. सायगाव येथे त्याकाळी त्या मुख्याध्यापिका होत्या तर त्यांचे पती पुंडलीक वाघ हे पालिकेच्या 16 नंबर शाळेचे मुख्याध्यापक होते. हे सधन कुटुंब असल्याने त्यांनी हा अस्थी कलश मुंबई येथील पवित्र चैत्यभूमी येथून आणलेला होता. आज या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती कलशाचे दर्शन घेऊन चाळीसगावकर आज धन्य झाले आहे. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चाळीसगाव येथे दिलेल्या भेटी आणि तेव्हाच्या ऐतिहासिक घटनांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. उपस्थीत सर्वांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवून हा आनंद साजरा केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे