आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पाचोरा तालुक्यात एका वाळू माफियाचा निर्घृण खून..!

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक युवकाचा कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील भातखंडेसह उत्राण परीसरात रविवारी सकाळी उघडकीस आली. 

वाळू वाहतूकीच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. सचिन उर्फ सोनू देविदास पाटील (40, अंतुर्ली नं.3, ता.पाचोरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाचोरा तालुक्यांतील अंतुर्ली नं.3 येथील रहिवासी सोनू पाटील हा तरुण खाजगी व्यावसायीक होता मात्र या तरुणाचा एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परीसरात आज सकाळी अज्ञात मारेकर्‍यांनी धारदार वस्तूने वार करीत खून केला.

आरोपींनी खुनाची घटना दडपण्यासाठी तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचीही प्राथमिक माहिती आहे. कासोदा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. नेमका हा खून करण्यामागचे ठोस कारण जरी समोर आले नसलेतरी वाळू वाहतुकीतील स्पर्धा व वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, कासोदा निरीक्षक निता कायदे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे