चाळीसगाव | विना रॉयल्टी गौण खनिज (मुरूम) डम्परामुळे, करगाव रोडचे प्रचंड नुकसान

चाळीसगाव | रात्री बेरात्री गौण खनिजाची (मुरूम)अवैध वाहतूकिमुळे करगाव रोडचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे ही चोरटी वाहतूक तत्काळ थांबवून दोषींवर राष्ट्रीय जनमंच पक्षाची संबंधित प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे.
चाळीसगावच्या धुळे रेल्वे लाईनला लागून करगाव रोडजवळ उभारण्यात येत असलेल्या मालवाहतुकीच्या रेल्वे धक्क्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमाची आवश्यकता आहे. मात्र हा सर्व कच्चामाल रॉयल्टी न भरता, अवैध मार्गाने रात्रीच्या अंधारात वाहून आणला जात असल्याचा गंभीर प्रकार आमच्या माहितीमध्ये आला आहे. दररोज रात्री 10 ते 12 डंपर रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत बेधडकपणे करगाव रोडवरून धावत असतात. या सर्व डंपरमधील मुरूमावर कुठलीही रॉयल्टी भरलेली नाही, असा स्पष्ट निष्कर्ष आमच्या तपासात आला आहे. या अवैध वाहतुकीत सत्ताधारी गटातील राजकारणी लोकांचा सहभाग असल्याची शंका होत आहे.
आरटीओची आडमुठपणा आहे का..?
एखाद्या गाडीवरील नंबर प्लेट चुकली, किंवा एक सीट जास्त आढळली, तरी दंड वसूल करणारे अधिकारी, रात्री तब्बल 40–50 टन वजनाचे ओवरलोडेड डंपर धडधडत असताना डोळे मिटून बसतात. आरटीओ अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का? की डोळ्यावर आर्थिक झालर पांघरली गेली आहे? असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगण्यात येत आहे.
तहसीलदार साहेब प्रामाणिकपणे काम करत आहेत, हे आम्ही मान्य करतो. परंतु त्यांच्या खालची यंत्रणा कशी काम करते याचे हे अत्यंत दुर्दैवी व ठळक उदाहरण आहे असे राष्ट्रीय जनमंच पक्षाची प्रशासनाला स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.



