आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

Jalgaon | परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव शहरात एक धक्कादायक वृत्त राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत संदीप पवार हे कार्यरत होते. दुचाकीने आल्यावर परीक्षेसाठी आत जाण्यापूर्वी ते महाविद्यालयासमोरील दुकानावर झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथेच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पवार यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे