ब्रेकिंग
सारोळा येथे शनीअमावस्या निमित्त महाप्रसाद कीर्तन व आरोग्य शिबिराचे आयोजन..
पाचोरा (झूम) पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील शनि धाम या ठिकाण उद्या वार शनिवार व शनी अमावस्या निमित्त महाप्रसाद कीर्तन व आरोग्य शिबिर सोहळा आयोजित केला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा सकाळी दहा ते बारा किर्तन होईल तदनंतर आरोग्य शिबीर होईल संत महात्म्यांचे प्रवचन होईल या सोहळ्यासाठी अयोध्ये वरून श्री विष्णुदास जी महाराज महा त्यागी हे सुद्धा सकाळी आठ वाजता उपस्थित राहणार आहे तसेच रोकडे हनुमान येथील श्री वासुदास बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच सामाजिक क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्रीक्षेत्र शनि धाम सारोळा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील भरत महाराज यांनी दिली आहे.



