आपल खान्देशआरोग्य व शिक्षणब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील मोंढाळे गावा नजीक ट्रक बस अपघात, प्रवाशांसह १६ विद्यार्थ्यांचा समावेश, ३३ जखमी

पाचोरा तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ पाचोरा येथून सातगाव डोंगरीला जात असलेला ट्रक हा सातगाव (डोंगरी) येथुन निघालेल्या पाचोरा आगाराच्या बसवर जावून धडकल्याने अपघात झाला. यात बस मधील १६ शाळकरी विद्यार्थी, बसचालक य एका महिलेसह २१ जण किरकोळ जखमी झाले. अपघात घडताच ट्रक चालकाने आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघातात जखमींमध्ये बहुतांशी विद्यार्थी श्री. गो. से. हायस्कूलमध्ये व के. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारे असल्याने ग्रामीण रुग्णालयात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संचालक सतिश चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मा. नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष विकास पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, के. पि. के. शिंदे विद्यालयाचे चेअरमन पंडित शिंदे, सचिव शिवाजी शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, गो. से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना चहा व बिस्कीट घेऊन त्यांना आधार दिला. तसेच जखमींवर डॉ. सतीष टाक,  डॉ अमित साळुंखे यांनी उपचार केले

पाचोरा तालुक्यातील पाचोरा आगारातील सातगाव डोंगरी येथून सकाळी साडेसहा वाजता निघाल्यावर मोंढाळे गावाजवळ असलेल्या नाल्यावर येत असतांना सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथून सातगाव (डोंगरी) कडे भरधाव वेगाने जात असलेला ट्रक क्रमांक एम. एच. १९ सी. वाय. ७५२१ हा बसवर जावून धडकली. यात बस चालक मधुकर बडगुजर (वय ४५) रा. लोहारी, दिपक पवार रा. नांदगाव तांडा, प्रणाली राऊतराय रा. प्रिंप्री, मिना तडवी रा. सार्वे यांना नाक तोड, पायावर व डोक्यावर जखमा झाल्या आहेत. जखमीवर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार करून किरकोळ जखमींना सुखरूप घरी सोडण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे