देश-विदेश

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टीलची माणुसकी

टाटा उद्योग समूहातील टाटा स्टील कंपनीने एक अनोखं पाऊल उचललं आहे, सोशल मीडियावर होतंय कौतुक

कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा योजना करोनाचा फटका बसलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टीलने सुरक्षा योजना जाहीर केली आहे. यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६० वर्ष सेवा पूर्ण वेतन देण्याचा निर्णय टाटा स्टीलने घेतला आहे. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उलचणार असल्याचंही जाहीर केलं आहे. टाटा स्टीलने ट्विट करत ही माहिती दिलीय.

कोरोना संकट काळात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत. काहींच्या घरातला कर्ता पुरुष किंवा महिला गेली आहे. अशा वेळी कुटुंबीयांसाठी रोजच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाल्याचं चित्र अनेक घरांमध्ये आहे.

कोरोना संकटात जीव गमावलेल्या टा स्टीलच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर 60 वर्षं म्हणजे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला संपूर्ण वेतन दिलं जाणार आहे. याबरोबरच संबंधित कुटुंबीयांना वैद्यकीय आणि राहण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील.

 

_____ __ _ Advertising _ __ ____

फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मुलांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार असल्याचं टाटा स्टीलने म्हटलं आहे.

कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्टीलप्रमाणे भक्कमपणे पाठीशी उभी राहील, असं टाटा स्टीलने म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यासाठी कटिबद्ध आहोत असंही कंपनीने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर टाटा स्टीलच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे.

टाटा स्टीलने अतिशय कौतुकास्पद असं पाऊल उचललं आहे. समाजाप्रती असलेलं आपलं देणं निभावणं तुम्ही चांगलंच जाणता. टाटा स्टीलच्या या भूमिकेचं शब्दात वर्णन करता येणार नाही. टाटा स्टील ला झूम मराठी मीडियाच्या वतीने सलाम…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे