आपल खान्देशगुन्हेगारी

चाळीसगाव रेल्वे स्थानकाशेजारील बालिकेवर बलात्कार प्रकरणी पाचोऱ्यातील आरोपीस आजीवन कारावास!

चार वर्षीय बालिकेस बिस्कीट पुडा देण्याच्या आमिषाने नेत तिच्यावर अत्याचार केला होता

चाळीसगाव : चाळीसगाव रेल्वे स्थानकानजीक चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पोस्को अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे न्यायालयात कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (27, मानसिंगका कॉलनी, पाचोरा, मूळ रा. लोंढरे, ता.नांदगाव) यास कारावासाची शिक्षा सुनावली.

नोव्हेंबर महिन्यात घडली होती घटना

27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान आरोपीने चार वर्षीय बालिकेस बिस्कीट पुडा देण्याच्या आमिषाने नेत तिच्यावर अत्याचार केला होता. पीडीते बालिकेच्या आईने या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात 28 रोजी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सावळाराम शिंदे यास तत्काळ अटक करण्यात आली होती. प्राथमीक तपास सहा पोलिस निरीक्षक विशाल टकले  यांनी केला.

17 दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे वर्ग केला. डी.एन.ए. अहवाल प्राप्त झाल्यानंतर 17 दिवसात तपास पूर्ण करून विशेष न्यायालयाच्या न्या.एस.एन.माने यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जलदगतीने या खटल्याचे कामकाज चालल्यानंतर 16 रोजी न्यायालयान आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास आजन्म कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोलिस उपअधीक्षक कैलास गावडे, सहा. निरीक्षक विशाल, राकेश पाटील, राहुल सोनवणे, विमल सानप, सबा शेख यांनी यशस्वी तपास केला. कामकाजात पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप सत्रे यांनी मदत केली. जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी युक्तीवाद केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे