कृषीवार्ता

पाचोरा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले

श्री संजय परदेशी (पाचोरा तालुका प्रतिनिधी)

पाचोरा – पाचोरा तालुक्यात आखतवाडे परिसरात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. आधीच बी-बियाण्याच्या वाढलेल्या किमतीने शेतकरी हवालदिल झाला असताना, आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. अनियमित पावसाने पेरलेले महागडे बी बियाणे कुजले असून, कृषी विभागाने याबाबत सर्वे करून मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यामधे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. याच पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. तालुक्यात अपूऱ्या पावसावर पेरणी झाली. परिणामी पेरणीनंतर पाच ते सहा दिवस पाऊस न आल्याने या पेरण्या उलटल्या आहेत. तालुक्यात सुरवातीलाच साधारण पाऊस पडला, मात्र पेरणी केल्यानंतरही जोरदार पाऊस झाल्याने बियाणे दबले जावून उगवण झाली नाही. परिसरातील अनेक गावात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पहिल्या पेरणीसाठी कर्ज काढून पेरणी केली असताना, दुबार पेरणीची सोय कशी करावी? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाने दुबार पेरणीबाबत पंचनामे करून किमान बियाण्याची मदत होईल, असे धोरण राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे