आपल खान्देश

‘प्रविण दरेकरांनी शेण खाल्लं’; पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

झूम मराठी पाचोरा (प्रतिनिधी ) भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना राष्ट्रवादीमधील महिलांच्या प्रवेशा बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे’, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जाहीर निषेध करण्यात आला तसेच यावेळी दरेकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

प्रविण दरेकर यांनी शिरूर इथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला हे वादग्रस्त वक्तव्य केलं. दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना चाकणकर यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे पाचोरा-भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात जोडेमारा आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष वंदनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर तसेच शहरातील सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनावेळी ‘प्रविण दरेकरांचा निषेध करून ‘दरेकरांचा धिक्कार असो.’, अशा घोषणा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे